Uruli Kanchan News : ‘तूच केस मिटवू देत नाही, तुलाच खल्लास करतो’, सासूला धमकी देत केले वार अन्…, नायगावमधील घटनेने खळबळ


Uruli Kanchan News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

पोटगी व मुलीचा ताबा मिळण्यासाठी पोलीस ठाण्यात केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून जावयाने सासूला चाकूने भोकसल्याची घटना घडली आहे. ही घटना नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श कॉलनी येथे बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Uruli Kanchan News

संग्राम बळवंत शिंदे (वय ३८, रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोंडनिंव ता. माढा जि. सोलापुर) असे हल्ला करणाऱ्या आरोपी जावयाचे नाव आहे. तर अलका गवळी (रा. नायगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या सासूचे नाव आहे.

या प्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (वय २८, रा. सध्या आर्दश कॉलनी नायगाव, ता. हवेली, जि. पुणे. मुळ रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोडनिंब ता. माढा जि.सोलापुर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी संग्राम व रुपाली यांचा विवाह झालेला आहे. त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. बुधवारी संग्राम हा रुपाली राहत असलेल्या ठिकाणी आला होता.

रुपाली शिंदे यांनी संग्राम याच्यावर पोटगी व मुलीचा ताबा मिळणेबाबत फिर्याद दिली होती. त्यानंतर संग्राम याने रुपालीला केलेली केस मागे घे, असे म्हणाला. यावेळी फिर्यादी आरोपीस जे काही होईल ते कोर्टात होईल” असे म्हणाले, याचा संग्रामला राग आला.

त्याने टिफिनच्या पिशवीतून आणलेला धार धार चाकू काढत रुपाली यांना तुला जिवानशी सोडणार नाही, असे म्हणाला. यावेळी संग्राम हा रुपालीच्या अंगावर धावून जात असताना अल्का गवळी यांनी मध्यस्थी केली. आरोपी संग्राम याने तुझ्यामुळेच सगळे होत आहे.

तूच केस मिटवू देत नाही. तुलाच खल्लास करतो असे म्हणत, जवळील धाराधार चाकूने सासू अल्का गवळी यांना ३ वेळेस भोकसले. तसेच डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले असल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संग्राम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!