शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेजमध्ये ‘शरद महोत्सव सप्ताह’ आयोजित..


उरुळी कांचन : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा काल वाढदिवस होता. राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस देशपातळीवर विविध ठिकाणी साजरा केला जातो.

तसेच शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त महात्मा उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे अध्यक्ष पद्मश्री जुनिअर कॉलेजमध्ये ‘शरद महोत्सव सप्ताह’ आयोजित केला आहे. यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला.

या उपक्रमाचे उदघाटन् मोठ्या उत्साहात पार पडले. उदघाटन प्रसंगी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजारामदादा कांचन, पालक विश्वस्त संभाजीराव कांचन, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, प्राचार्य भोसले सर, विभागप्रमुख ठाकरे सर ,जाधव सर, कांचन सर, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!