Pune News : मोठी बातमी! पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले, १० नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई, कारण काय?


Pune News पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे आता बदलत चाले आहे. पुणे सध्या शिक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीच चर्चेत आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही पुण्यात वाढत आहे. अशातच पुणे शहर परिसरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरात रात्री १.३० वाजेनंतर देखील ‘आफ्टर पार्टीज्’ सुरु असल्याचे समोर आलेआहे. पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर आणि पब्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील १० हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आली आहे.

या हॉटेल्सवर कारवाई…

नारंग वेंचर

हॉटेल मेट्रो

लेमन ग्रास, विमाननगर

बॉलर

हॉटेल काकाज

प्लंज, कोरेगाव पार्क

लोकल गॅस्ट्रो बार

एलरो

युनिकॉर्न

आर्यन बार, बालेवाडी. 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!