Gas Cylinder : डिसेंबरचा पहिलाच दिवस अन् सर्वसामान्य लोकांना महागाईचा झटका, गॅसचे दर वाढले…


Gas Cylinder : आज १ डिसेंबर, आजपासून २०२३ च्या शेवटच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. वर्षाचा शेवटचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी, तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत ४१ रुपयांनी वाढ केली आहे, तर ही वाढ 19 Kg व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रांत करण्यात आली आहे.

अद्ययावत किमतींनुसार, राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता १७९६.५० रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १७२८.०० रुपयांवरुन १७४९.०० रुपये झाली आहे.

एलपीजी सिलेंडरच्या किमती IOCL वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या असून बदललेल्या किमती १ डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दिवाळीपूर्वी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत १०३ रुपयांनी वाढ केली होती आणि १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीत त्याची किंमत 1१८३३.०० रुपये झाली होती, मात्र १६ नोव्हेंबरला छठ पुजेच्या निमित्तानं एलपीजी सिलेंडवर दिलासा देण्यात आला होता. आणि सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी कमी करत १७५५.५० रुपये झाली होती, मात्र वर्षाच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर पुन्हा एकदा ४१ रुपयांनी वाढवले आहेत. Gas Cylinder

दरम्यान, महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलेंडरच्या किमती बदलत असतात. त्यामुळे घरगुती सिलेंडरची किंमत वाढेल की काय अशी सर्वसामान्य लोकांना धास्ती असते. मात्र सध्या डिसेंबरमध्येही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जुन्याच दरांवर कायम आहे . मुंबईत गॅस सिलेंडरचे दर ९०२.५० रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!