आजपासून शिर्डी, सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस , जाणून घ्या कसा असणार तिकीट दर…!


पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 वाजता मुंबईत दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. यामुळे याचा अनेकांना फायदा होणार आहे. मुंबई ते सोलापूर किंवा मुंबई ते साईनगर शिर्डी असा प्रवास करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे.

यामध्ये मुंबई आणि सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोलापूरमधील सिद्धेश्वर आणि जवळील अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. यामुळे तीर्थक्षेत्र यात्रा करणारांना फायदेशीर ही ट्रेन आहे.

मुंबई ते सोलापूर 6.35 तासांत पोहोचता येईल. मुंबई ते सोलापूर दरम्यान, ही वंदे भारत ट्रेन दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा घेणार आहे. मुंबई-शिर्डी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसने नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनि सिंगणापूर आणि साईनगर शिर्डी सारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.

मुंबई ते शिर्डी हे अंतर वंदे भारत एक्सप्रेस 5.24 तासांत पार करता येणार आहे. ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड या तीन स्थानकांवर थांबेल. या गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील. आरक्षण बुकिंग आजपासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.

यामध्ये वंदे भारत ट्रेनमधून मुंबईतून पुण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चेअर कार अर्थात सीसीसाठी 560 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअर अर्थात ईसीसाठी 1135 रुपये भाडं आकारण्यात येणार आहे. पुढे हे दर वेगवेगळे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!