Diwali 2023 : दिवाळी पार्टीची तयारी कशी कराल?, जाणून घ्या…

Diwali 2023 उरुळीकांचन: दिवाळीच्या निमित्ताने पार्टी करण्याची वेगळीच मजा असते. कारण सर्वाची मने उल्हासाने भरलेली असतात. दिवाळीची पार्टी दिवाळीच्या एक. दिवस आधी या एक दिवस नंतर ठेवावी. कारण दिवाळीत सर्वांसाठी पूजनाचा मुहूर्त असतो.
यादी बनवा : जर आपल्याकडे कॉम्प्युटर असेल तर त्यावर आधीच पाहण्यांची यादी बनवा. जर कॉम्प्युटर नसेल तर मोबाइलवरही यादी बनवू शकता. जेव्हा घरातील सारे असतील तेव्हा यादी बनवण्यास सुरुवात करावी, यामुळे सर्व पाहण्यांची नावे समाविष्ट करता येतील. पाहुण्यामध्ये ज्यांची भेट कमी होते, अशा पाहण्यांची नावे आवर्जून घाला. Diwali 2023
तारीख ठरवा : आपल्या सर्व पाहुण्यांना ‘विचारूनच तारीख ठरवावी, यामुळे पाटीला पाहुणे येण्याची गॅरटी राहील.
केटरर वा आचाऱ्याची व्यवस्था : जर आपण स्वतःच खाणे बनवत असाल तर काही हरकत नाही पण जर जास्त लोकांना बोलावत असा केटररची सेवा घेणे योग्य ठरेल. तुम्हालाही तयार होण्यासाठी आणि पाहुण्यांशी गप्पा मारण्यासाठी वेळ मिळेल. खाण्य-पिण्याचे हलकेफुलके आयटम ठेवावेत. दिवाळीत जड़ पदार्थ जास्त केले जातात. पार्टी रात्री उशीरपर्यंत चालते, त्यामुळे स्नॅकसारखे पदार्थ जास्त प्रमाणात ठेवावेत.
घराची सजावट : एकदा खाण्याचे काम सोपवल्यानंतर आपण आरामात घराच्या सजावटीकडे लक्ष देऊ शकता. दिव्यांची सजावट कोठे करायची, कोठे मेणबत्या व लायटिंग लावायची. रांगोळी व फुले कशी सजवायची या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ राहील. यासाठी खरेदीही आधीपासूनच करून ठेवावी. नंतर बाजारात खूप गर्दी होते.
संगीत : पार्टीत सुरुवातीला थोडे हलके संगीतच ठेवावे. जेव्हा आपल्या भेटीगाठी, गप्पा होतील व खाणे होईल त्यानंतर धमाकेदार संगीत ठेवावे. ज्यावर नाचण्यात खूप मजा येऊ शकेल. आपले कपडे आदी आधीच तयार ठेवाल व कसे तयार व्हायचे हेही आधीच ठरवून घ्या. मुलांसाठी सुविधाजनक कपडे असायला हवे.
आता आणखी काही विशेष :
दिवाळीचे क्षण संस्मरणीय करा…
दिवाळी साजरी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सकडे लक्ष द्याल, तर कुटुंबासोबत साजरी केलेली दिवाळी कायम आठवणीत राहू शकेल.
• विभक्त कुटुंबात राहात असाल तर सासरी जाऊनच दिवाळी साजरी करावी. वृद्धजन आपल्या मुलांनी यावे आणि आपल्यासोबत दिवाळी साजरी करावी, अशी आशा बाळगत असतात.
• सुती कपड्यांचा वापर करावा कारण केव्हा कोठून ठिणगी येऊन अपघाताची शिकार करील याचा नेम नसतो.
• घरात बर्नाल व पाण्याने भरलेली बादली अवश्य ठेवा. मुलांना एकटे फटाके उडवू देऊ नये. सोबत एखादी मोठी व्यक्ती असावी.
• घातक बॉम्ब, जादा आवाज करणारे तीव्र बॉम्ब दिवाळीच्या आनंदावर विरजण टाकू शकतात.
• शेजारी व नातेवाईकांना मिठाई वाटण्याचे काम दिवाळीच्या एक दिवस आधीच उरकून घ्यावे. यामुळे दिवाळीत कुटुंबीयांना एकत्र बसून आनंदात घालवण्यासाठी वेळ मिळू शकतो.
• सेल वा लालूच पाहून अनावश्यक आणि हलक्या प्रतीच्या वस्तू खरेदी करू नयेत. दुकानदार विशेष धोरणानुसार जुना माल दिवाळीत बाहेर काढतात. तपासूनच सेलमधील वस्तू खरेदी कराव्यात.
• ड्रायफ्रूट खरेदी करताना त्यांची गुणवत्ता चेक करावी. ड्रायफ्रूटच्या रेडिमेड डब्यांमध्ये जुनाट व शिळा माल भरलेला असतो. यासाठी उत्तम माल खरेदी करून स्वतः डबे बनवावेत.
• जर आपण एखाद्या मोठ्या पदावर असाल तर दिवाळीच्या नावाखाली लाच देणाऱ्यांपासून दूर राहावे.
• वृद्ध मंडळींकडे जास्त लक्ष द्यावे. फटाक्यांच्या धुराने त्यांना त्रास होऊ शकतो. मुलांनाही धुरापासून दूर ठेवावे.