Pune News : मोठी बातमी! पोलीस कोठडीत ललित पाटीलची प्रकृती बिघडली, उपचार सुरू..


Pune News : ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली असून मागील तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. या तीन वर्षांच्या काळात नऊ महिने ससून रुग्णालयात विविध उपचाराच्या नावाखाली तो राहिला. त्यानंतर ससून रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी तो फरार झाला होता.

पंधरा दिवस फरार राहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली. या दरम्यान मुंबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला कोठडीत घेतले. Pune News

पुणे पोलिसांच्या कोठडीत त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला पुन्हा जुन्या आजारांचा त्रास होत आहे. त्याच्यावर कोठडीतच उपाचार केले जात आहे. ललित पाटील याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे.

परंतु त्याला आता ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता पोलीस कोठीतच उपचार दिले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ललित पाटील याच्यावर यापूर्वी स्वत: ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर उपचार करत होते.

त्याला टीबी आजारासह पाठदुखीचा देखील आजार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याला हार्नियाही झाला होता. लठ्ठपणाचा आजारही त्याला दाखवण्यात आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!