Gold Silver Rate : दिवाळीत सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दरात झाली ‘एवढी’ घसरण, जाणून घ्या..


Gold Silver Rate : दिवाळीचा सण सुरु झाला असून. या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये घसरण नोंदवली जात आहे. सोनं चांदी स्वस्त झाल्यानं सणासुदीच्या काळात लोकांना स्वस्त सोन्याची भेट मिळाली आहे. सोनं आज ६०,००० रुपयांच्या खाली गेले आहेत.

सकाळी सोन्याचे दर हे ५९ हजार ९०३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होते. त्यानंतर सोन्याच्या दरात आणखी घसरण दिसून आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ते कालच्या तुलनेत १२९ रुपये म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.

सध्या सोन्याचा दर हा ५९ हजार ८८० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले आहेत. कालच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव ६०,००९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. Gold Silver Rate

सोन्याव्यतिरिक्त आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या आधी, कालच्या तुलनेत चांदी १ टक्क्यांनी म्हणजेच ७०९ रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी ७० हजार ३४१ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात चांदी ७० हजार ४५० रुपयांवर उघडली आहे. तेव्हापासून त्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. आज वायदे बाजारात चांदी ७१ हजार ५० पये प्रति किलोवर बंद झाला.

प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या…

पुणे- 24 कॅरेट सोने 60,760 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम,चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम
मुंबई- 24 कॅरेट सोने 60,760 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम

लखनौ- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो

चेन्नई- 24 कॅरेट सोने 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलोग्रॅम
दिल्ली- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!