Diwali 2023 : दिवाळी आली घरा!! आज वसुबारस, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्व…


Diwali 2023 : घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणाऱ्या दिवाळीच्या सणाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत असून, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस साजरी होणार आहे. विशेष म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मान आहे.

दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. आपला देश शेतीप्राधन असल्याने वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. शेतकरी उत्साहात हा दिवस साजरा करतात. वसुबारसपासून गायगोधनाचे मालक, शेतकरी एकमेकांच्या घरी, गोठ्यात जाऊन ‘आली आली रे दिवाई, दिवा करजो भाताचा’सारखी दिवाळीची गाणी म्हणतात.

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. विशेष म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस पासून सुरू होतो. दिवाळीचा हा पहिला दिवस गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. दरम्यान गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. Diwali 2023

तसेच यावेळी गाईला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. खरं तर वसुबारस हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. गायी आणि वासरांना मान देण्यासाठी हा सण साजरा करतात. विशेष म्हणजे या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंध आहे.

कारण ज्या काळात अमृत किंवा जादुई अमृत शोधण्यासाठी देव आणि दानव समुद्रमंथन करून धडपडत होते. त्यावेळी दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. त्यामुळे कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंधित आहे. महत्वाची बाब म्हणजे दैवी प्राणी देखील भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवतार यांच्याशी संबंधित आहे.

हिंदू धर्मात गाईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!