Maharashtra Kesari : लोणीकंदला रंगणार आज महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा थरार! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लावणार उपस्थिती..!!

Maharashtra Kesari उरुळीकांचन : महाराष्ट्र केसरी किताबी स्पर्धा अतिशय रंगदार अवस्थेत पोहचली असून गत विजेता शिवराज राक्षे, उपविजेता सिकंदर शेख , पृथ्वीराज पाटील अशा दिग्गज मल्लांची उपांत्य फेरीत थाप आता गुंजणार आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबाकडे सर्वाधिक लक्ष असलेला सिकंदर शेख याने प्रकाश बनकरवर १ गुणानी विजय मिळवत उपान्त्य फेरी गाठली आहे. आज स्पर्धेतील उपांत्यफेरीचे सामने रंगणार असून लढतीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुस्ती स्पर्धेला भेट देणार असुन महाराष्ट्र केसरी गादी व माती विभागातील अंतिम कुस्ती त्यांच्या हस्ते होणार आहे. Maharashtra Kesari
अशा होणार मह उपांत्य लढती..
गादी विभाग –
पै.शिवराज राक्षे × पै.सुदर्शन कोतकर
पै.पृथ्वीराज पाटील × पै.माऊली कोकाटे

माती विभाग
पै.सिंकदर शेख × पै.पृथ्वीराज मोहोळ
पै.विक्रम भोसले × पै.संदीप मोटे

Views:
[jp_post_view]