Accident News : मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू..

Accident News केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्यासोबत आज मोठी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ते सुदैवाने बचावले आहेत. मात्र या घटनेत एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री पटेल यांचा ताफा छिंदवाडा येथून जनसंपर्क अभियान आटोपून नरसिंगपूरला परतत होता. तेवढ्यात त्यांच्या ताफ्यासमोर भरधाव वेगाने जाणारी दुचाकी आली.
त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मंत्र्यांची गाडी शेतात उतरली. या अपघातात प्रल्हाद पटेल किरकोळ जखमी झाले. या अपघातात ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच निवडणुकीच्या निमित्ताने प्रल्हाद सिंह पटेल हे छिंदवाड्यात आले होते. ते छिंदवाडा येथून कार्यक्रम आटोपून नरसिंहपूर जात होते. Accident News
या दरम्याव संबंधित अपघाताची घटना घडली. विशेष म्हणजे प्रल्हाद पटेल हे नरसिंहपूरच्या मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार देखील आहेत. पण त्यांच्यासोबत आज ही अनपेक्षित आणि दुर्देवी घटना घडली आहे.
प्रल्हाद सिंग पटेल हे ७ जुलै २०२१ पासून भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री आहेत. ते मध्य प्रदेशातील दमोह लोकसभा मतदारसंघातून खासदारही आहेत. मध्य प्रदेशातील भाजप-आधारित मतदारसंघातून ते पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले.
मे २०१९ मध्ये पटेल हे सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र आयुक्त) बनले. 2019 मध्ये ते भाजपचे सदस्य म्हणून मध्य प्रदेशातील दमोह येथून लोकसभेवर निवडून आले.