Pune Crime News : सासऱ्याचे सुनेसोबत धक्कादायक कृत्य, सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल…


Pune Crime News : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुनेशी अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ३२ वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार ६२ वर्षीय सासऱ्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime News

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार महिला आणि तिच्या पतीचा वाद झाला होता. ती वेगळी राहत होती. सून ही हिंगणे खुर्द परिसरातील एका मंदिरासमोर थांबली होती. त्या वेळी सासरा तेथे आला. ‘आपल्या समाजात दुसरे लग्न करायची प्रथा नाही. मी तुला सदनिका घेऊन देतो.

मुलगा आणि सासूला सांगू नको. मी तुझा सांभाळ करेन’, असे सांगून सासऱ्याने सुनेचा विनयभंग केला. याप्रकरणी सासऱ्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!