Pune Crime News : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने लाखो रुपयांचा गंडा, कोंढवा येथील घटना..

Pune Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसेच शहरात फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सध्या एक अशीच घटना समोर आली आहे.

फ्लॅट विक्री करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फ्लॅट नावावर न करता ३० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime News
अब्दुल मोबिन शेख (वय. ६३ रा. कौसरबाग सोसायटी, कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ईम्रान तालुकदार खान (वय.४४ रा. युनिटी पार्क, कोंढवा खुर्द, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी याने त्याचा कोंढवा खुर्द येथील युनिटी पार्कमधील फ्लॅट नंबर 801 विकायचा असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांना फ्लॅट घेयचा असल्याने त्यांनी आरोपी ईम्रान खान यांच्यासोबत फ्लॅटचा व्यवहार केला.
खान याने फिर्यादी शेख यांना फ्लॅट 35 लाख रुपयांना विकला. व्यवहार ठरल्यानंतर शेख यांनी खान याला आर.टी.जी.एस व रोख स्वरुपात 30 लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर अब्दुल शेख यांनी फ्लॅट नावावर करुन देण्यास सांगितले.
मात्र, ईम्रान खान याने फ्लॅट नावावर करुन देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्य़ादी यांनी पैसे परत मागितले असता इम्रान खान याने फिर्यादी शेख यांना जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी अब्दुल शेख यांनी न्यायालयात दाद मागितली.
न्यायालयाच्या आदेशानुसार कोंढवा पोलिसांनी ईम्रान खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.