Shah Rukh Khan : शाहरुखच्या ‘जवान’चा जगात डंका! ‘या’ यादीत स्थान मिळवणारा ठरला पहिला भारतीय सिनेमा…

Shah Rukh Khan : शाहरूख खानला किंग खान अशी पदवी त्याचा चाहत्यांनी दिली आहे. अभिनेताही आपण आपल्या चाहत्यांनी केलेल्या कौतुकास कसे पात्र आहोत याची प्रचिती सतत देत असतो. शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.

जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. अशातच आता युएईमध्ये या सिनेमाने इतिहास रचला आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, यूएईमध्ये ‘जवान’ हाईएस्ट ग्रॉसर सिनेमा ठरला आहे. Shah Rukh Khan
यूएईमध्ये शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा पाहत आहेत. त्यामुळे यूएई बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हाईएस्ट ग्रॉसर सिनेमांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. यूएईमध्ये या सिनेमाने ७५ कोटींची कमाई केली आहे.

यूएईच्या हाईएस्ट ग्रॉसर सिनेमांच्या यादीत अवतार 2, एवेंजर एंडगेम, स्पायडरमॅन : नो वे होम, फ्यूरियस 7, द फेट ऑफ द फ्यूरियस, अलादीन, टॉप गन : म्हेवरिक, द लायन किंग या सिनेमांचा समावेश आहे. आता या यादीत ‘जवान’ या सिनेमाचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा २ नोव्हेंबर २०२३ रोजी अभिनेत्याच्या वाढदिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळेल. भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ने 640 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात ११ कोटींचा गल्ला जमवला आहे. Shah Rukh Khan