Pimpri Chinchwad News : धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याने मजुराचा दगडाने ठेचून खून, दोन जणांना बेड्या..

Pimpri Chinchwad News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या अशीच धक्कादायक घटना समोर आली . Pimpri Chinchwad News
दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांनी मिळून एका मजुराचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथील प्राइड वर्ल्ड सिटीच्या लेबर कॅम्पजवळ सोमवारी (ता. ३०) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे.
गणेश भंगडा भिलाला (रा. झांजर, ता. बऱ्हाणपूर, जि. नेपानगर, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, लालू जगन डावर (३३, रा. झांजर, ता. बुऱ्हाणपूर, जि. नेपानगर, मध्य प्रदेश), भुरा सीताराम किराड (२३, रा. चौपाली, हेलापडाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश. दोघे सध्या रा. प्राइड वर्ल्ड सिटी लेबर कॅम्प, चऱ्होली बुद्रुक) यांना पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहिती नुसार, मृत गणेश आणि अटक केलेले दोघे संशयित हे प्राइड वर्ल्ड सिटी येथे मजुरीचे काम करत होते. संयशित लालू आणि भुरा यांनी गणेश यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र गणेश यांनी पैसे दिले नाहीत.
दरम्यान, या कारणावरून चिडून जाऊन राग मनात धरून दोघांनी गणेश यांच्या डोक्यात, पाठीवर व इतर ठिकाणी मारहाण करून ठार मारले, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.