मोठी बातमी : उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय…!


पुणे : सध्या पुणे महानगरपालिका क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेने दोन गावांना पालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोनं महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने घेतला आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची याची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी 6 डिसेंबर 2022 ला निर्देश दिले होते. आता मुख्यसभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल.

यामुळे तो निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मागणी आणि पाठपुरावा देखील सुरू आहे. यामुळे लवकरच याबाबत देखील निर्णय होईल.

दरम्यान, उरुळी देवाची कचरा डेपोची जागा मात्र महापालिका हद्दीत ठेवण्यात आली आहे. इतर जागा मनपा हद्दीतून वगळली आहे. यामुळे आता वेगळी महानगरपालिका होणार का हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!