Accident News : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्स बस उभ्या ट्रकला धडकली, दोन प्रवाशी जागीच ठार..

Accident News पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटाच्या पायथ्याशी सोलापुरवरून प्रवासी घेऊन पुणेकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. Accident News

तर, १५ ते १८ प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच जखमींना वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गुरूवार (ता. २६) पहाटे हा अपघात झाला आहे. Accident News
सत्यभामा शिवराव बोचने (ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या प्रवाशी महिलेचे आहे. एका मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची माहिती घेऊन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाताना पाटस (ता. दौंड) हद्दीत सिमेंट वाहतुकीच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे हा ट्रक (एमएच १२ युएम २८५४) घटनास्थळी रस्त्याच्या कडेला उभा केला होता. दरम्यान खासगी ट्रॅव्हल्स बस (एमएच ०९ सीव्ही ४५९७) लातूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती.

यादरम्यान पहाटे थांबलेल्या ट्रकला पाठीमागून या ट्रॅव्हल्स बसची जबर धडक झाली. या अपघातात बसच्या समोरील एका बाजूच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिसांनी पाटस दौंड व परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. या अपघातात लक्झरी बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सिमेंट मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडल्याने नुकसान झाले आहे.