Bribe Case : भिगवणमध्ये आक्रीतच घडलं! आधी फौजदार निघाला लाचखोर नंतर त्याला भेटलेला वकीलही लाचखोर, पुणे अ‍ॅन्टी करप्शनने टाकली धाड अन् उडाली खळबळ..


Bribe Case : अपघात झाल्यानंतर विम्याची भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागण्या करता फौजदाराने ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन २० हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि वकील यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. Bribe Case

या लाचखोरीच्या प्रकरणात पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई भिगवन पोलीस ठाण्याच्या समोर रविवारी (ता.२२) केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. Bribe Case

भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे (वय .५३) आणि ॲड. मधुकर विठ्ठल कोरडे (वय. ३५ रा. मु.पो. मिरजगाव, डाक बंगल्याजवळ, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी ४१ वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, या घटनेतील तक्रारदाराच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले. कोर्टात विम्याचा दावा दाखल करण्यासाठी धडक दिलेल्या वाहनाची इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे हवी होती. ही कागदपत्रे तक्रारदार मुलगा हा फौजदार प्रवीण लोकरे यांच्याकडे काही दिवस जात होता.

यामध्ये मध्यस्थी मिरजगावच्या मधुकर कोरडे या वकिलाने केली आणि दोघांनी मिळून तीस हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती ही लाच २० हजारावर ठरली. मात्र तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि तक्रार दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लोकरे याने लाच मागितल्याचे व कोरडे यांच्यामार्फत ही लाच घेण्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, त्यावरून पथकाने सापळा रचला. रविवारी (ता.२२) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिगवण पोलीस स्टेशनजवळच सापळा लावला होता. ही २० हजारांची लाचेची रक्कम वकील कोरडे याने फौजदार लोकरे याच्यासाठी पंचासमक्ष स्वीकारली. लोकरे याचे लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले, यावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!