Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला केले आत्महत्येस प्रवृत्त, पतीसह तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


Pune Crime  पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

मानसी सुजित थोरात (वय. २२ रा. मांजरी खु. ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती सुजित बाळासाहेब थोरात, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत मानसी हिच्या आईने (रा. वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी सुजित आणि मयत मानसी यांचा डिसेंबर 2022 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपींनी मानसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पती, सासू आणि नणंद यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला वैतागुन मानसीने गुरुवारी (ता.१९) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, मानसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!