मोठी बातमी ! आग्र्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास कोर्टाकडून परवानगी ! मात्र दिल्ली कोर्टाने घातली ही अट…!

नवी दिल्ली : ऐतिहासिक आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याबाबत दिल्ली हायकोर्टानं निर्देश दिले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकार सहआयोजक असेल तरच पुरातत्व खात्यानं विचार करावा, असं कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटले आहे. आग्रा किल्यात पुरातत्व खात्याने शिवजयंती परवानगी नाकारल्याने दिल्ली हायकोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुणावनीत कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाननं उत्तर प्रदेशातील आग्रा येथील किल्यावर जयंती सोहळा आयोजित करण्याची परवानगी माघितली होती. पण पुरातत्व खात्याने परवानगी नकारली होती. हा खासगी कार्यक्रम असल्यानं पुरातत्व खात्यानं याला परवानगी नाकारली होती.
दरम्यान हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पुरातत्व खात्यानं बाजू मांडताना सांगितलं की, सन २००४ पासून खात्याच्या धोरणात झालेल्या बदलानुसार खासगी कार्यक्रमांना परवानगी देताना पुरातत्व खात्याच्या महासंचालकांचा आदेश अंतिम असतो. त्यामुळं या सोहळ्यात जर महाराष्ट्र सरकार सहआयोजक होणार असेल तर कार्यक्रम घेण्याचा विचार करता येईल, असं कोर्टानं म्हटलं आहे. पण जर पुरातत्व खात्यानं परवानगी दिली नाही तर याचिकाकर्त्यांना पुन्हा कोर्टात दाद मागता येईल असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.त्यामुळं आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होण्यासाठी आता राज्य सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे.
