Pune News : पुण्यातील प्रसिद्ध शाळेतील संतापजनक प्रकार, नववीच्या विद्यार्थ्यांकडून लहान मुलांचं लैंगिक शोषण..


Pune News पुणे : पुण्यातील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. शाळेतीलच इयत्ता ९वीच्या मुलांनी हे कृत्य केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Pune News

पुण्यातील या शाळेत ७ ते ८ मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती असून. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. पोलीस, पालक, मनसे कार्यकर्ते शाळेच्या आवारात जमले तसेच मोठी घोषणाबाजी सुरू केली. पालकांनी शाळेत येऊन ज्या मुलांनी हे कृत्य केलंय त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेत लैंगिक शोषण सुरु असल्याचा आरोप पालक करत आहेत. अनेक पालकांनी काही वेळ शाळा बंद केली होती. पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शाळेत पोलिसही दाखल झाले. तसेच दोषींवर योग्यती कारवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!