Wagholi News : सोशल मीडियावर तरुणाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ, लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


Wagholi News  पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देवी-देवतांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. Wagholi News

सागर सावंत (वय. २१ रा. निओ सिटी मागे, बी.जे.एस. कॉलेज वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र दिलीप पडवळ (वय. ३० रा. वडकी गाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास वाघोली येथे घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी सागर सावंत याने फिर्यादी यांच्या बीड येथे राहणाऱ्या मित्राच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर कमेंट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

तसेच हिंदु देवी-देवतांबद्दल अश्लील विधान केले. आरोपीने हिंदुंच्या धार्मिक भावनांचा अपमान करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांनी याबाबत तक्रार देताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!