Pune News : फ्लॅट भाड्याने देताना काळजी घ्या! भाड्याने फ्लॅट घेण्याचे आमिष दाखवून तोतया आर्मी अधिकार्‍याने घातला साडेतीन लाखांना गंडा..


Pune News पुणे : आर्मी अधिकारी असल्याचे सांगून भाड्याने फ्लॅट घेत असल्याचे भासवून एका तोतयाने महिलेला ३ लाख ६९ हजार ५२७ रुपयांना गंडा घातल्याची घटना सध्या समोर येत आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी रोडवरील एका ३३ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ ते १६ मे २०२३ मध्ये घडला. Pune News

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. त्यांना एकाने मोबाईलवर संपर्क साधला. आपण आर्मीमध्ये असून फ्लॅट भाड्याने पाहिजे असल्याचे सांगितले. त्यांच्या गुगल पेवर किरकोळ रक्कम पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या खात्यावरुन ३ लाख ६९ हजार ५२७ रुपये काढून घेऊन त्यांचीफसवणूक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!