Pune News : खेडमध्ये ग्रामपंचायत सदस्याचा खून, व्यावसायिक वर्चस्वातून हत्या झाल्याने उडाली खळबळ..

Pune News पुणे : पुण्यातील खेड तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ग्रामपंचायत सदस्स्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्यावसायिक वर्चस्वातून ही हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे. Pune News
संतोष रामदास दौंडकर (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड) असे हत्या झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
संतोष हे काल शुक्रवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या गोडाऊनजवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. संतोष यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताचा अंगठा तुटून पडला. हल्लेखोर हल्ला करतच होते.
तसेच संतोष हे आपला बचाव करण्यासाठी पळत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या सराईत गुन्हेगारांनी केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आतापर्यंत गावकऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.