Pune News : येरवडा कारागृहात राडा! एका कैद्याचा थेट दुसऱ्या कैद्यावर हल्ला, रक्तबंबाळ होईपर्यंत…


Pune News पुणे : येरवडा मध्यवर्ती पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Pune News

पत्र्याच्या तुकड्याने या कैद्याने दुसऱ्या कैद्यावर वार केल्याची घटना घडली Pune News आहे. रोहन हरिदास माने असं या हल्लेखोर कैद्याचं नाव आहे. त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना कारागृहातील सर्कल १ परिसरात घडली आहे. या कारागृहात ऋषभ ऊर्फ सनी शेवाळे आणि त्याच्या साथीदारांनाही ठेवण्यात आलं आहे. सनी शेवाळे आणि त्याच्या साथीदारांना लोणी काळभोर पोलिसांनी पकडलं होतं. त्यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, सनी शेवाळे एकटा असल्याची संधी साधून रोहन माने याने सनीवर हल्ला चढवला. रोहनने सनीवर पत्र्याच्या तुकड्याने वार केले. त्यामुळे सनी रक्तबंबाळ झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!