Nagpur Flood : नागपूर पाण्याखाली! १० हजार घरात पाणीच पाणी, ५० हजारांची मदत जाहीर..

Nagpur Flood नागपूर : नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरातील पूर सदृश्य स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पालिकेच्या मुख्यालयात महत्वाची आढावा बैठक झाली. (Nagpur Flood )
या बैठकीला नागपूर मनपा आयुक्त, नागपूर मनपा उपायुक्त आणि लोकप्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते.मुसळधार पावसामुळे १० हजार घरांत पाणी घुसले आहे. या बैठकीनंतर देवेद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नुकसानग्रस्त दुकानादारांना राज्य सरकारने ५० हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती देवेद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आमची आढावा बैठक पार पडली आहे. नागपुरात कमी वेळात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळं नागनदीचे पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरले. या पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या पावसात १० जनावरांना मृत्यू झाला आहे.
‘मुसळधार पावसामुळे (Nagpur Flood )१० हजार घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या दुकानदारांना तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये मदत देत आहोत. या दुकानांचं नुकसान झालेल्यांना ५० हजार रुपये, छोट्या दुकानदारांना १० हजार मदत दिली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे नागपूर येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. हवामान खात्याकडून नागपूरमध्ये आज पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.