Rain Update : राज्यात पुढील ४ तास अतिशय महत्वाचे, पुण्यासह या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार, जाणून घ्या…


Rain Update पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सक्रीय झाला असून पुढच्या काही दिवस पाऊस असाच बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (Rain Update)

तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत पावसांच्या जोरदार सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Rain Update)

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, जालना, संभाजीनगरमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील ३ ते ४ तास नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यात आज पुण्यात सकाळपासून पावसाची संतधार सुरू आहे.

उद्यापासून पुढील ३ दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मॉन्सून अतिसक्रिय असल्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

त्याचबरोबर उद्यापासून २९ सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी राहील, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामानतज्ज्ञांनी दिली आहे.

हवामाने विभागाने मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच याबरोबर सोमवारपासून २५ सप्टेंबर भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!