Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची मागितली माफी, नेमकं काय झालं? जाणून घ्या…

Chandrashekhar Bawankule पुणे : भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राज्यातील अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलने केलीत. (Chandrashekhar Bawankule)

या सर्व घडामोडीदरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुणे(Pune News) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी विरोधात असो की सत्तेत कोणत्याही नेत्याबद्दल असंस्कारी शब्द कधीही मान्य केले नाही.
यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समज दिली, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करणार्या व्यक्तीला एक प्रतिष्ठा आहे. कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे आम्ही सत्तेत असो की विरोधात असो, आम्ही सत्तेचा उन्माद करणार नाही.

आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळीदेखील स्पष्ट भूमिका होती आणि आताही आहे. कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे अजित पवार यांचं मन दुखवलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो, असे बावनकुळे म्हणाले.