Women Reservation Bill 2023 : मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकावर आज ७ तास चर्चा, मोदी सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत


Women Reservation Bill 2023  नवी दिल्ली : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले आहे. आज या विधेयकावर सात तास चर्चा होणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आज या विधेयकावर बोलणार असून त्या भाजप सरकारला घेरणार आहेत. त्यामुळे संसदेतील आजच्या कामकाजावर देशाचे लक्ष लागले आहे. Women Reservation Bill 2023

या विधेयकावर विरोधकांकडून काय मुद्दे मांडले जातात, सरकारही या मुद्द्यांना कसे खोडून काढणार? परिसीमन आणि जनगणनेच्या मुद्द्यावर सरकारचे मत काय? जर विधेयक पास झाले तर कधी लागू होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्याच्या विधानमंडळांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्याची तरतूद केली आहे.

कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही. आजही ही जनगणना पूर्ण झालेली नाही. महिला आरक्षणाबाबत विरोधकांच्या मनात एक शंका आहे. ती म्हणजे जनगणनेनंतर परिसीमन होईल. त्यानंतर हे विधेयक लागू होईल. त्यामुळे बराच काळ लागले. या सर्व मुद्द्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विधेयक कसे लागू होणार?

जनगणना आणि परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच महिलांना आरक्षण मिळेल हे सत्यच आहे. देशात २०२१मध्ये जनगणना व्हायची होती. पण कोरोनामुळे होऊ शकली नाही. आता पुढे ही जनगणना कधी होईल याची काहीच शाश्वती नाही. काहीच माहिती नाही. आता २०२७ किंवा २०२८मध्ये जनगणना होणार असल्याचंही सांगितले जात आहे.

मात्र, ही जनगणना २०३१ 1मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. या जनगणनेनंतरच परिसीमन होईल. त्यानंतर हे विधेयक लागू होईल. वाढत्या लोकसंख्येच्या आधारे योग्य प्रतिनिधीत्व मिळावं आणि सर्वांना समान अधिकार मिळावेत म्हणून परिसीमन केले जाते.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!