Devendra Fadnavis : अजित पवारांबाबतच्या विधानामुळे फडणवीसांनी पडळकरांना झापले, म्हणाले…


Devendra Fadnavis मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले हाेते. तसेच, त्यांच्यावर आमचा विश्वास नसल्याचे म्हटले होते. त्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटत आहे. Devendra Fadnavis

त्यावर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली असून, पडळकरांचे वक्तव्य अयोग्य असून, त्यांनी अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असा सल्लाही दिला.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य हे अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणे अत्यंत चुकीचे आहे. तीनही पक्षांतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तीनही पक्षांतील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सणवार काही माहिती नसते. त्यांना फक्त राजकारण करायचे असते. सणावाराला कसे बोलले पाहिजे, हे त्यांना समजत नाही. काय करायचं आपण. त्यांना गणेश सुबुद्धी देईल आणि त्यापुढे ते असं बोलणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. पण, उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले नव्हते. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!