Pune Crime News : डोक्यात सळई पडून कामगाराचा मृत्यु, ठेकेदारावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune Crime News पुणे : चौथ्या मजल्यावरुन सळई डोक्यात पडल्याने कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना मांजरीतुन (Pune Crime News) समोर आली आहे. याप्रकरणी ठेकेदारावर हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल गडदे (वय २९, रा. शेवाळवाडी) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे.अशोक किशन शिंदे (वय ५५, रा. काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादीचे पती विठ्ठल गडदे हे मांजराई व्हिलेज येथे विष्णु भोला दास यांच्या इमारतीचे काम चालू होते. तेथे काम करणारे ठेकेदार अशोक शिंदे यांनी बांधकामासाठी तिसर्या माळ्यावर लोखंडी सळया ठेवल्या होत्या.

विठ्ठल गडदे यांना कामावर असताना हेल्मेट पुरवले नव्हते. तिसर्या माळ्यावरुन गडदे यांच्या डोक्यात लोखंडी सळई पडली. त्यात ते जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
