Accident News : आजारी आईची भेट घेण्यासाठी लगबगीने निघाला, पण वाटेतच मृत्यूने गाठले, आईचा काळजाचा तुकडा जग सोडून गेला…

Accident News पुणे : आजारी आईला भेटण्यासाठी पुण्याहून (Pune) लगबगीने निघाला. मात्र, रस्त्यातच काळाने डाव साधला. एका भरधाव कारने त्याच्या दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत (Accident News )त्याचा मृत्यू झाला. त्याची आईसोबतची भेट अखेर अधुरीच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हा अपघात (Accident) जळगाव (Jalgaon) रस्त्यावर फरशी फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडला .आपल्या मुलाची वाट पाहत नजर लावून बसलेल्या माउलीला त्याचे पार्थिव पाहण्याची वेळ आली. (Accident News )
समाधान विठ्ठल राऊत (वय ३२, रा. शिवना, ता. सिल्लोड) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शिवना येथील समाधान राऊत हा तरुण मागील काही वर्षांपासून पुणे येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. इकडे गावाकडे काही दिवसांपासून त्याची आई आजारी होती. त्यामुळे सुट्टी काढून शुक्रवारी पहाटे तो आईला भेटायला आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १४ जीएक्स ४४९७) निघाला होता.

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाने सिल्लोडकडे जात असताना फरशी फाटा येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एमएच ०२ सीआर ३०२२) त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
यात समाधान गंभीर जखमी झाला. त्याला काही नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, इकडे मुलगा येणार असल्याने वाट पाहणाऱ्या आईसमोर त्याचा मृतदेह आल्याने त्या माउलीने हंबरडा फोडला. या घटनेची नोंद वडोदबाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोना. रवी देशमुख करीत आहेत.