Yawat News : गोविंदा आला रे…यवत येथे गोपाळकालाचा मोठा उत्साह, जिल्हा परिषद शाळेत दहीहंडीचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषा..


Yawat News : यवत : सध्या राज्यासह देशात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साह साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी मोठी मोठी मंडळे मानाची दहीहंडी फोडण्यास तयार झाले आहेत. याची सर्वजण वर्षभर वाट बघत असतात. यामुळे याचा मोठा उत्सव राज्यात सुरू आहे.

असाच उत्साह दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत (Yawat News )स्टेशन येथे बघायला मिळाला. गोपाळकाल्याच्या निमित्ताने (ता.७) दहीहंडीचे (Dahi Handi) आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेत विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थी श्रीकृष्ण, गोविंदा व गोपिका यांची वेशभूषा करून आले होते. विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार सादर केले आहे.  यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला.

याप्रसंगी केंद्रप्रमुख प्रणयकुमार पवार, मुख्याध्यापिका जयश्री रायकर, संगिता टिळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दिपाली थोरात, शिक्षक रामहरी लावंड, संगीता वाळके आदी पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री रायकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आपले पारंपारिक सण व उत्सव यांचे महत्त्व पटावे, म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन शाळेमध्ये केले जाते, तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

दरम्यान, दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत असे उपक्रम राबवले जात आहेत, याचे समाधान व चांगल्या उपक्रमाची जोरदार चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!