Pune Crime : ऑक्सिजन मास्क काढले अन् मामाचा जीव तडफडायला लागला, सर्वांना बसला मोठा धक्का, भाच्याने नेमकं काय केलं.?


Pune Crime  पुणे : कौटुंबिक वादातुन भाच्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मामाचा नाकाला लावलेला ऑक्सिजन मास्क काढून त्यांच्या नाका-तोंडावर टॉवेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास ) व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत यांचे डॉ. मिनू मेहता हॉस्पिटलमध्ये पुरुषोत्तम मधुकर कुलकर्णी (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) हे दि. ९ मे २०१२ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विषबाधा झाल्याने आयसीयू वॉर्डात उपचार घेत होते.

फिर्यादी विशाल विजय कुलकर्णी (रा. बोटा, ता. संगमनेर) याचा मावसभाऊ असलेला आरोपी विठ्ठल एकनाथ असलेकर (रा. जांबूत, ता. शिरूर, जि. पुणे) याचे आईवडील यांच्यात झालेले भांडण मामा पुरुषोत्तम यांनी मिटविले नाही याचा राग मनात धरून त्यांच्यावर उपचारासाठी लावलेल्या सलाईन व त्यांच्या नाकाला लावलेल्या ऑक्सिजनचा मास्क काढून त्यांच्या नाका-तोंडावर टॉवेल टाकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी अधिकारी सपोनि आवताडे यांनी केला होता. गुन्ह्यात सरकारी वकील देशमुख मॅडम व रासकर मॅडम यांनी काम पाहिले. तसेच जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी व खेड कोर्ट पैरवी अधिकारी सहायक फौजदार खरात यांनी काम पाहिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!