धक्कादायक! ढोल ताशाच्या सरावासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून, घटनेने पुणे हादरलं…


पुणे : कोंढवा भागात ढोल ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याचा सासवड परिसरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

प्रतिस्पर्धी टोळीला माहिती दिल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाचा टोळक्याने खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोन सराइतांना पोलिसांनी अटक केली.

साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणकर, कापरे सराइत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, खून झालेला अल्पवयीन मुलगा हा कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात राहतो. शनिवारी (ता.२) तो ढोल ताशा पथकात सरावासाठी गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी न परतल्याने रविवारी त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा अल्पवयीन मुलाबरोबर गेलेला एकजण बेपत्ता झाला असून, तो कोंढव्यातील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या पायाला जखम झाली होती.त्याची चौकशी केली असता अल्पवयीन मुलाचे लोणकर आणि कापरे यांनी अपहरण करुन त्याला सासवड येथे नेऊन मारहाण केली.

यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तेथे टाकून आरोपी फरार झाले. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. आहे. तसेच दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!