प्रेमाच्या जाळ्यात ओढल अन्…; पुण्यात अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य, आरोपीला अटक..

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत गैरवर्तन करुन एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना आरोपीच्या लोहगाव येथील मित्राच्या घरी ५ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी वाघोली येथील १६ वर्षाच्या मुलीने विमातळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मोहित युवराज साळवे (वय. १९ रा. येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. आरोपीने मुलीला मित्राच्या घरी नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, याबाबत मुलीच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने मुलीकडे विचारणा केली. आरोपी आणि मुलीमध्ये प्रमेसंबंध असल्याचे समजताच सोमवारी (ता.४) पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
दरम्यान पोलिसांनी मोहित याच्यावर गुन्हा दाखल अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.