काय सांगताय! पुणेकर कुटुंब कारने गाठणार लंडन, ३२ देश आणि ३० हजार किलोमीटर प्रवास..


पुणे : पुणेकर कधी काय करतील सांगता येत नाय. तुम्ही दुसऱ्या देशात जाण्यासाठी हवाई किंवा समुद्रमार्गने प्रवास करून जाऊ शकता. मात्र पुण्यातील एक कुटुंब कारने जगातील ३२ देशांमध्ये प्रवास करणार आहे, असे सांगितले तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही

मात्र पुण्यात राहणाऱ्या एका कुटुंबाने थेट आपल्या रेंज रोव्हर कारने लंडनपर्यंतचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेक सोनवणे हे आपल्या कुटुंबासोबत हा प्रवास करणार आहे. ३२ देश पार करत ते लंडन प्रवास पूर्ण करणार आहेत. याशिवाय वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्व हे एक कुटुंब आहे, हा संदेश देत ते प्रत्येक देशात जाणार आहे.

३२ देशात भारताच्या संस्कृतीचे दर्शन ते या माध्यमातून घडवणार आहेत. आज त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना आज लोणावळा येथील नागरिकांनी झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेछा दिल्या आहेत.

या प्रवासासाठी त्यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या आहेत. त्यात त्यांना पाच देशाचा व्हिसा मिळालेला असून ३० हजार किमीचा त्यांचा प्रवास असणार आहे.

ते यातून दुबई, इराण, तुर्की, बल्गेरिया, डेन्मार्क, जर्मनी, स्विझरलँड, इटली, फ्रान्स आणि लंडन असा प्रवास ते करणार आहेत. या दरम्यान त्यांचा तीन वेळा बोटीतून आणि एकदा समुद्राखालून जाणाऱ्या बोटीतून ते प्रवास करणार आहेत.

देशाला आणि शहरवासीयांना अभिमान वाटावा असा त्यांचा प्रवास असणार आहे. हा त्यांचा १२० दिवसांचा प्रवास असणार असून ३२ देशांतून ते हा प्रवास करणार आहेत. असा प्रवास करणारे ते भारतातील पहिले मराठी कुटुंब असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!