Pune Crime : बाप ठरला हैवान, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पत्नीची केली हत्या, लोणीकंद पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..


Pune Crime पुणे : जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. ही घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळवाडी येथील माहेर संस्थेजवळ गुरुवारी (ता. ३१) रोजी घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दिपाली संदिप मोरे असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती संदिप मोरे याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मुलीच्या वडिलांनी दारु पिऊन तिचा विनयभंग केला. यावरुन आरोपी आणि पत्नी यांच्यात वाद झाला होता. यानंतर 31 ऑगस्ट रोजी पहाटे आरोपीने मुलगी झोपली असताना पुन्हा तिचा विनयभंग केला.

पीडित मुलीने आरडा ओरडा केल्याने तिच्या आईने येऊन पतीला विरोध केला. आरोपीने पत्नीला लाकडी बांबुने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भिंतीवर डोके आपटून खाली पाडून तिच्या गळ्यावर पाय देऊन तिचा गळा जोरात दाबला

.त्यावेळी आईला सोडवण्यासाठी फिर्य़ादी आणि तिचा भाऊ आले असता आरोपीने त्यांना देखील बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीने दुचाकीमधील पेट्रोल आणून फिर्यादी यांच्या आईच्या अंगावर आणि गुप्तांगावर टाकून जाळून मारण्याची धमकी दिली.

मुलीने हा सर्व प्रकार तिच्या मामाला सांगितला. मामाने लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देऊन जखमी झालेल्या फिर्य़ादी यांच्या आईला दवाखान्यात
उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!