राजकारणातील सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार.?
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणीसुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे. पीएम मोदी पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली असल्याचे राजकीय सुत्रांनी म्हटले आहे.
तसेच पीएम मोदी यांनी पुण्यातून लढवणे हे भाजपसाठी सोपे मानले जात आहे. काही सर्व्हेक्षणातून भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट होण्याची शक्यता असल्याचे समोर आल्यानंतर भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे.
जर पीएम मोदी पुण्यातून लढले तर पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर त्याचा प्रभाव जाणवेल, अशी रणनिती भाजपने आखली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. पीएम मोदी यांनी याआधी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. आता ते पुण्यातून निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Views:
[jp_post_view]