शिक्षक व पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्याने शिंदे व फडणवीस सरकार निवडणुका लांबवतील ; अजित पवार यांचे लोणीकाळभोर कार्यक्रमात भाकित…!


उरुळी कांचन : शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निकालाने शिंदे व फडणवीस सरकार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबवतील , असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी लोणी काळभोर येथील कार्यक्रमात लगावला आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत १२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामदार पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार होते.

यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर, विलास आण्णा काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, पुणे जिल्हा कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा किरण काळभोर, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे मजी सरपंच नंदू काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, योगेश काळभोर, सदस्य भरत काळभोर, नागेश काळभोर, प्रियंका काळभोर, अमित काळभोर, युवराज काळभोर, सुभाष टिळेकर, संतोष कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते.

यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात शिंदे व फडणवीस यांनी राज्याचे विधायक प्रश्न सोडून सत्ताकेंद्रीत राजकारण सुरू केले आहे. महागाई, बेरोजगारीवर सरकार बोलत नाही, परंतु धार्मिक मार्गाने सत्तेचे ध्रुवीकरण सुरू आहे. राज्यात एकही महिला मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून फक्त महिला सबलिकरणाच्या गप्पा हे सरकार मारीत आहे. शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवणुकीत महाविकास आघाडीचे प्रतिबिंब दिसले असून भाजपला विचार करायला लावणारा निकाल आहे. महाराष्ट्राचा मूढ एका सर्व्हेतून समोर आल्यानंतर फडणवीस- शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होण्याची परिस्थिती बनली आहे असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी केले. सूत्रसंचालन भरत काळभोर यांनी तर आभार माजी उपसरपंच योगेश काळभोर यांनी मानले.

बाजार समिती व कारखाना प्रश्नावर मौन ?

हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील बाजार समिती तब्बल १९ वर्षानंतर निवडणूक होऊ घातली आहे .या निवडणुकीबद्दल अजित पवार हे बोलतील अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र बाजार समिती व तालुक्यात भिजत पडलेल्या यशवंत कारखान्यावर बोलल्यावर त्यांनी मौन बाळगल्याने चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी चे शिष्टमंडळ दादांना भेटून बाजार समितीच्या निवडणूकीबाबत भूमिका घेतील, अशी अपेक्षा होती . मात्र दादांनी हा विषय घेतलाच नसल्याने बाजार समितीबाबत पक्षाची मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!