आधी सौंदर्याने भुरळ घालायची आणि नंतर…; तरुणांना लाखो रुपयांना लुटले, धक्कादायक घटनेने खळबळ..


नवी दिल्ली : सध्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाले असुन सोशल मीडियाच्याद्वारे अनेकांची फसवणूक होत असल्याची घटना दररोज समोर येत असतात.

तर, अनेक नागरिकांना सौंदर्याच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक होऊ लागली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ५ स्टार हॉटेलमध्ये बिझनेस मिटिंगच्या नावाखाली हे पाच जण अधिकाऱ्यांच्या भेटी घेत घेऊन. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांशी शारिरीक संबंध ठेवून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

गोवा पोलिसांनी याप्रकरणी उलट तपासणी केली असता त्यांना या व्यक्तीच्या आणि महिलांच्या नावाने अनेक तक्रारीची नोंद केली असल्याची माहिती मिळाली आहे.

मोठ्या कंपनीतील व्यक्तींना या महिला सौंदर्याच्या जाळ्यात ओढतात तर, त्यांच्याबरोबर संबंध तयार करून स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करतात.

त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी संबंधित व्यक्तींकडून त्या लाखो रुपयांची मागणी करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची माहिती समोर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!