आई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, अल्पवयीन मुलाने आईलाच…; मुलाच्या कृत्याने सगळेच हादरले..


मुंबई : अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या वसई परिसरात घडली आहे. कुऱ्हाडीने वार करत त्याने माऊलीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुलाला मांडवी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुनिता सुनिल घोगरा असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, माजिवली परिसरात राहणाऱ्या सुनिता सुनिल घोगरा या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली-देपिवली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्या होत्या. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवण करून सुनिता घोगरा आपल्या खोलीत झोपल्या होत्या.

यावेळी त्यांच्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. काही वेळाने सुनिता घोगरा यांचे पती सुनिल घोगरा घरी आले. त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

त्यानंतर त्यांनी तात्काळ सुनीता यांना उपचारासाठी भिवंडी येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे सुनिता यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी मांडवी पोलिसांनी पती व मुलगा यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता मुलाने खून केल्याचे समोर आले.

दरम्यान, आपली आई नेहमी कोणाशी तरी फोनवर बोलत असते. हे आपल्या आवडत नसल्याचे मुलाने सांगितले. आईचे कोणाशी तरी संबंध असावेत, असा त्याचा संशय होता. त्याचप्रमाणे व्यसनाधीन झालेल्या मुलाने पैसे न दिल्याच्या रागातून आपल्या आईची हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!