अनैतिक प्रेमसंबंध असताना महिला निघून गेल्याने मुलाला जीवे मारण्याची धमकी, कोंढवा येथील घटनेने खळबळ…

पुणे : प्रेमसंबंधातून एकत्र राहात असताना अचानक महिला निघून गेली. त्यानंतर तुझ्या आईला कोठे लपवून ठेवले आहेस, असे विचारुन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकी आली आहे.

याप्रकारणी कोंढवा येथे राहणार्या एका २३ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका ४१ वर्षाच्या गृहस्थाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच वस्तीमध्ये रहातात. फिर्यादी यांची आई व आरोपी यांचे प्रेमसंबंध आहेत. त्यातून फिर्यादीची आई सुमारे १५ दिवसांपासून आरोपीच्या घरी राहात होती.

फिर्यादीची आई अचानक कोठेतरी निघून गेली. त्यामुळे आरोपी हा वारंवार फिर्यादीला फोन करुन तू तुझ्या आईस कोठे लपवून ठेवले ते सांग असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे.
दरम्यान, याप्रकरणी तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका ४१ वर्षाच्या गृहस्थाविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
