धक्का लागल्याने दाम्पत्याची तरुणाला मारहाण, लोकलच्या धडकेत तरुणाचा…,मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल..


मुंबई : मुंबईतील सायन रेल्वे स्थानकात महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरुन दाम्पत्याने एका तरुणाला मारहाण केली होती. मारहाणीत तोल जाऊन रेल्वे रुळांवर पडल्यानंतर वर येऊ शकण्याआधीच लोकल ट्रेनने तरुणाला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला.

दिनेश देवराव राठोड (वय. २६ रा. किनखेड, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) असं या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

दिनेश राठोड मुंबईत बेस्ट बसचा वाहक म्हणून नोकरी करत होता. दिनेशच्या घरची परिस्थिती खूपच नाजूक आहे. कुटुंबाचा आर्थिक भार मुलावरच होता. दिनेश राठोड १३ ऑगस्टला नोकरीवरुन नवी मुंबईतील घणसोली येथे राहत असलेल्या घरी येत होता.

मुंबईतील सायन रेल्वे स्थानकात महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरुन दाम्पत्याने एका तरुणाला मारहाण केली होती. मारहाणीत तोल जाऊन रेल्वे रुळांवर पडल्यानंतर वर येऊ शकण्याआधीच लोकल ट्रेनने तरुणाला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला.

सायन रेल्वे स्थानकावर घरी येण्यासाठी तो लोकल रेल्वेची वाट बघत होता. यावेळी काही जणांनी त्याचा मर्डर केला. सर्व प्रकार हा तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झालेला आहे. आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, अशी विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दिनेशवर १५ ऑगस्ट रोजी त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई , बहीण, दोन लहान भाऊ असा मोठा परिवार आहे. दिनेशचं बि ए पर्यंतचे शिक्षण झाले होते. अत्यंत मनमिळावू असलेल्या दिनेशची कोणतीही चूक नसतांना त्याला प्राणास मुकावे लागल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!