धक्कादायक! घराशेजारी राहणाऱ्या तिघा नराधमांचा ८ वर्षीय मुलावर अश्लील ध्वनिचित्रफीत दाखवत अनैसर्गिक अत्याचार…!
पुणे : पुण्यात एका अल्पवयीन मुलावर घराशेजारी राहणाऱ्या तिघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील आरोपींनी अल्पवयीन मुलाला अश्लील ध्वनिचित्रफीत दाखवून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादाक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. चिमुरड्यावर गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने अनैसर्गिक अत्याचार केले जात आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान , या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये तिघांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष उर्फ पक्या प्रकाश शिंदे (वय २१), हेमंत उर्फ हेम्या महेश माळवे (वय १९), किरण सुरेश सावंत (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी एकाच भागात राहायला आहेत.या प्रकरणातील आरोपी किरण सावंत याने मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला धमकावून ध्वनिचित्रफीत नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देऊन त्याच्यावर दोन महिने अत्याचार करण्यात आले.
या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर पेटीमध्ये टाकून लॉक करुन एका खड्ड्यात टाकीन, तुझ्या आईवडिलांनी विचारले कुठे गेला तर आम्हाला माहिती नाही, असे सांगेन, अशी धमकी दिली होती.
या सर्व प्रकरणात घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने याबाबतची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.