मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवरील बोगद्यात 7 ते 8 वाहनांची जोरदार धडक ; वाहनांचं मोठं नुकसान

पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बोगद्यामध्ये तब्बल ७ ते ८ वाहनांची जोरदार धडक झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला आहे. खोपोलीजवळच्या बोरघाट येथील एका बोगद्यात सुमारे ७ ते ८ वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातात ट्रक आणि कारचा समावेश आहे.मुंबई पुणे महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना खोपोली नगर पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.
दरम्यान या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
Views:
[jp_post_view]