पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलती, राज्य सरकारने घेतला निर्णय…!
पुणे : सध्या पुण्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलतीसह तीन पट शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत भाजपचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
या निर्णयानंतर मिळतकरात पुन्हा ४० टक्के सूट मिळणार, त्यामुळे पुणेकरांची अतिरिक्त करातून सुटका होणार, अशा आशयाचे ट्विट केले आहे. यामुळे आता दिलासा मिळाला आहे.
तसेच येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा अधिकृत प्रस्ताव आणून त्याला मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
Views:
[jp_post_view]