शिखर शिंगणापूरच्या यात्रेत 13 भाविक दरीत कोसळले…!


सातारा : फलटण तालुक्यातील शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रेला मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेनिमित्त मुंगी घाटातून कावड चढविताना तब्बल 13 भाविक दरीत कोसळले. या सर्व भाविकांना सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांकडून वर काढण्यात यश आलं आहे. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

 

साताऱ्यापासून पूर्वेकडे 90 किमी अंतरावर असणाऱ्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काल या यात्रेसाठी राज्यभरातील भाविक कावडसह दाखल झाले होते. अवघड अशा मुंगी घाटातून सासवड पंचक्रोशीतील मानाच्या कावडीने दुपारी दोन वाजल्यापासूनच मुंगी घाट चढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी घाटातून काही भाविक कावड घेऊन गड चढत असताना 13 भाविक कावडीसोबत खाली दरीत कोसळले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी तात्काल रेस्क्यू ऑपरेशन राबवित या सर्व भाविकांना दरीतून वर काढले.

या सर्व जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी फलटण येथे हलविण्यात आले आहे. तसेच यात्रेत एक वृद्ध बेशुद्धावस्थेत आढळला, तर कावड वर चढवून आणल्यावर एक कावडीधारक अत्यवस्थ होऊन बेशुद्ध झाला. या दोघांनाही फलटण व दहिवडी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!