महसूल खात्यातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती, आयएएस, गजानन पाटील यांच्यासह विजयसिंह देशमुख यांचाही समावेश..


पुणे : महाराष्ट्रातील महसूल विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली.

महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील १२ ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. त्यामुळे, हे 12 अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले आहेत.

यामध्येच बारामतीचे माजी प्रांताधिकारी व सध्या संभाजीनगर मध्ये कार्यरत असलेले विजयसिंह देशमुख, त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचाही समावेश आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात कार्यरत असलेले विजयसिंह देशमुख, विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील, महेश पाटील, आशा पठाण, पंकज देवरे, मंजिरी मनोलकर, राजलक्ष्मी शहा, सोनाली मुळे, गजेंद्र बावणे व प्रतिभा इंगळे या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळालेली असून भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांचा समावेश झाला आहे.

मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला आहे, असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!