पुणे जिल्ह्यातील ११ लाख ६१ हजार बालकांना जापनीज एन्सेफलायटीस लस मिळणार, 70 टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात म्हणून दक्षता…


पुणे : जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र, खाजगी व शासकीय शाळांमधील बालकांना हे लसीकरण होणार आहे. यामध्ये 1 वर्ष ते 15 वर्षाखालील 11 लाख 61 हजार 331 बालकांना मार्च 2025 पासून जापनीज एन्सेफलायटीस लस दिली जाणार आहे. ही लसीकरण मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आहेत.

यासाठी 3 हजार 728 लसीकरण शिबिरे घेतली जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील 574 जणांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे. 15 वर्षाखालील बालकांना आढळणारा हा जापनीज एन्सेफलाइटिस आजार घातक आहे आशिया खंडात ॲक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोममुळे हा आजार होतो.

या आजारात सुमारे 70 टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात. तसेच त्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन मेंदूची व बौद्धिक अक्षमता आढळून येते. यामुळे याबाबत गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. प्रथमच होत असलेल्या या लसीकरणाच्या अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी या सदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!